मोठी बातमी! भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला, भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार
मुंबईच्या भाईंदरमध्ये इथे भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर दोन अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. त्या पतीसोबत डॉक्टरांना भेटायला जात असताना त्यांच्या हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली आहे तर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मुंबई : भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान यांच्यावर काल रात्री भाईंदरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती आहे. नया नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
- कपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदाने सांगितलं गुपित; 10 पैकी 8 लोकांनी नैसर्गिक पद्धतीने कमी केला डायबिटिज
मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाल्या. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, सुलताना खान यांच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.१५ च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात असताना मीरा रोड परिसरात दोन दुचाकीस्वारांनी येऊन त्यांची दुचाकी कारसमोर उभी केली. त्यांना शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे. तर पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.