रक्षकच बनले भक्षक! आधी गुंगीचे औषध दिले, दारूही पाजली; पीएसआयचा विद्यार्थिनीवर अत्याचार

पोलिस अधिकाऱ्याने चिखलदऱ्यातील लॉजमध्ये नेऊन नागपुरात राहणाऱ्या सतरावर्षीय मुलीवर अत्याचार केला. अत्याचारापूर्वी त्याने मुलीला गुंगीचे औषध देऊन दारूही पाजली

गुंगीचे औषध दिले; दारूही पाजली

कपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदाने सांगितलं गुपित; 10 पैकी 8 लोकांनी नैसर्गिक पद्धतीने कमी केला डायबिटिज

म.टा. प्रतिनिधी, नागपूरः पोलिस अधिकाऱ्याने चिखलदऱ्यातील लॉजमध्ये नेऊन नागपुरात राहणाऱ्या सतरावर्षीय मुलीवर अत्याचार केला. अत्याचारापूर्वी त्याने मुलीला गुंगीचे औषध देऊन दारूही पाजली. मुलीच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी अत्याचार, पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

प्रदीपकुमार श्रीकृष्ण नितवने (वय ३५, रा. फ्रेण्ड्स कॉलनी, गिट्टीखदान) असे अटकेतील अधिकाऱ्याचे असून, तो नक्षलविरोधी अभियानाच्या (एएनओ) नागपुरातील पोलिस उपमहानिरीक्षकांच्या कार्यालयात कार्यरत आहे. या घटनेने एएनओमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी नागपुरातील महाविद्यालयात बारावीत शिकते. प्रदीपकुमार तिचा स्थानिक पालक आहे. १३ जुलैला फिरायला जाण्याच्या बहाण्याने कारने तो मुलीला चिखलदरा येथे घेऊन गेला. तत्पूर्वी त्याने एका हॉटेलमध्ये विद्यार्थिनीला दारू पाजली. चिखलदऱ्यातील लॉजमध्ये नेऊन तिला गुंगीचे औषध दिले. त्यानंतर त्याने मुलीवर अत्याचार केला. मुलगी शुद्धीवर आली. तिने त्याला जाब विचारला. याबाबत कोणाला सांगितल्यास प्रदीपकुमारने तिला ठार मारण्याची धमकी दिली. तिला नागपुरातील घरी सोडले. मुलीने आई-वडिलाला प्रदीपकुमारने अत्याचार केल्याची माहिती दिली. तिचे आई-वडील नागपुरात आले. मुलीला घेऊन सीताबर्डी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रदीपकुमारला अटक केली. सीताबर्डी पोलिसांनी रविवारी प्रदीपकुमारला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

मोबाइल लोकेशन बंद करायला लावले

मुलीची माहिती मिळवण्यासाठी प्रदीपकुमारने तिच्या मोबाइलमध्ये लोकेशन अॅप्लिकेशन डाउनलोड केले. चार दिवसांपूर्वी त्याने मुलीशी संपर्क साधला. सरप्राइज देणार असल्याचे सांगितले. बुधवारी अॅप्लिकेशन व मोबाइल बंद ठेवण्यास सांगितले. ‘नातेवाइकांनी विचारणा केली तर मोबाइल नादुरुस्त असल्याचे सांग’, असे तो मुलीला म्हणाला. ओळखीचा असल्याने मुलीने त्याच्यावर विश्वास ठेवला.

‘मी आत्महत्या करेन’

प्रदीपने मुलीवर अत्याचार केला. ‘अत्याचाराची माहिती तू आई-वडिलाला दिल्यास माझी बदनामी होईल. मी आत्महत्या करेल’, अशी धमकीही प्रदीपकुमारने मुलीला दिली. त्याने पोलिसांत तक्रार न करण्याची विनवणी मुलीच्या आई-वडिलांनाही केली, त्यांची क्षमाही मागितली, अशी माहिती आहे. यापूर्वीही एका फसवणुकीच्या प्रकरणात प्रदीपकुमार हा चर्चेत आला होता, असे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *