बाप्पा मोरया! एलटीटीवरुन गणपती विशेष रेल्वे सुटणार, ‘या’ तारखेपासून बुकिंग सुरू
यंदाच्या गणेशोत्सवासाठी वाढती मागणी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मंगळुरू दरम्यान आठ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
- कपिवा अकादमी ऑफ आयुर्वेदाने सांगितलं गुपित; 10 पैकी 8 लोकांनी नैसर्गिक पद्धतीने कमी केला डायबिटिज
यंदाच्या गणेशोत्सवासाठी वाढती मागणी लक्षात घेता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) ते मंगळुरू दरम्यान आठ विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. १६ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या दरम्यान या गाड्या धावणार असून आज, सोमवारी या गाड्यांचे आरक्षण खुले होणार आहे.
यानुसार, गाडी क्रमांक ०११६५ लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मध्यरात्री १२.४५ वाजता निघणार आहे. त्याच दिवशी ही गाडी रात्री ९.३० वाजता मंगळुरू येथे पोहोचेल. गाडी क्रमांक ०११६६ मंगळुरूहून रात्री १०.२० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सायंकाळी सायंकाळी ६.३० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
या रेल्वेगाड्यांना एक प्रथम वातानुकूलित, तीन द्वितीय वातानुकूलित, पंधरा तृतीय वातानुकूलित, दोन जनरेटर व्हॅन आणि भोजनयान असे डबे असणार आहेत.